* अलिबागच्या प्रिझम अकादमीत जागतिक आपत्ती दिन
मुरुड / राजीव नेवासेकर :- आपल्या गावात, रस्त्यावर कोणत्याही प्रकारची आपत्ती आल्यास त्यासाठी त्वरित मदत करुन जिवित व वित्तहानी वाचविणे ही ख-या अर्थाने देशसेवाच आहे आणि म्हणूनच पोलिस दलात दाखल होऊन देशसेवा आपण निश्चितपणे कराल. याची मला मनोमन खात्री वाटते, असे प्रतिपादन भारत सरकारच्या मेरा युवा भारत सरकार गृह अलिबाग शाखा व प्रिझम अकादमीने जागतिक आपत्ती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आपत्ती व्यवस्थापन तज्ञ प्रा. डॉं. जयपाल पाटील यांनी केले.
यावेळी प्रा. डॉं. जयपाल पाटील, प्रा. शाम जोगळेकर, प्रिझम अकादमीच्या अध्यक्षा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी गोंधळी,संचालिका सुचिता साळवी व्यासपीठावर उपस्थित होते.
कोणतीही आपत्ती कधी, केव्हा येईल. हे सांगता येत नाही. यासाठी जागतिक कितीॅचे आपत्ती व्यवस्थापन तज्ञ प्रा. डॉं. जयपाल पाटील यांना मार्गदर्शनासाठी मेरा युवा भारत, खेल मंत्रालय केंद्राकडून जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे यांनी आपल्याकडे पाठविले असल्याचे तपस्वी गोंधळी यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
पाटील सरांचे मार्गदर्शन मी 2016 ला घेतले आहे ते सांगतात ती माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल. यानंतर संविधान वाचन करून वीजेबाबत "दामिनी" ॲप, वाहन परवाना स्वतःजवळ नसेल तर याबाबत शिक्षा व दंडाची माहिती दिली. वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास स्व. गोपीनाथ मुंडे विमा रुपये 2 लाख कुटुंबाला दिले जातात याची माहिती मुलामुली, महिला सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र पोलिस 112 क्रमांकाचा वापर, साप-विंचु दंश वेळेत व अपघात प्रसंगात 108 रुग्णवाहिकेचा वापर याचे प्रात्यक्षिक देताना 108 चे रायगड उपप्रमुख अजय जगताप यांना मोबाईल करताच डॉं. जयप्रकाश पांडे व पायलट सुशांत पाटील हजर झाले, त्याचे स्वागत तपस्वी गोंधळी यांनी केले.
जेष्ठ नागरिक अथवा बाळंतपणासाठी जाणाऱ्या महिलेस हाताच्या घडीवर रुग्णवाहिकेतून कसे न्यायचे याचे प्रात्यक्षिक यावेळी दाखविण्यात आले. यावेळेस प्रा. शाम जोगळेकर यांनी खास करून मुलींवर होणारे अत्याचाराबाबत काळजी कशी घेता येईल व तुम्ही पोलिस दलात भरती झाल्यास नोकरी करताना भ्रष्टाचाराला कधी जवळ येऊ देऊ नका आणि आपल्या गावासह रायगड जिल्ह्याचे नाव उज्वल करा, असे आवाहन करून प्रा. डॉं. जयपाल पाटील यांनी आपली लाडू कविता ऐकून दाखविली. या कार्यशाळेत 45 मुले व 55 मुली उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. संचालिका सुचिता साळवी यांनी आभार मानले.
Post a Comment
0 Comments