* पाच जणांचा विशेष सत्कार
मुरूड / राजीव नेवासेकर :- मुरुडच्या श्रीकाळभैरव नागरिक सहकारी संस्थेतर्फे मुरुड तालुक्यातील सर्व जातीधर्माच्या दहावी, बारावी व पदवीधर झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा विशेष गुणगौरव करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रातील ५ सत्कार मुर्ती यांनाही विशेष गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्या सहाय्यक निबंधक स्वरुपा धुमाळ यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी चेअरमन दिपक पालशेतकर, व्हाईस चेअरमन स्नेहा पाटील, सचिव निवास रसाळ, कोषाध्यक्ष सुरेश कासेकर, दिपक मयेकर, मनोहर कासेकर, उषा खोत, सुप्रेश खोत, प्रतीक पेडणेकर यांच्यासह कर्मचारी वृंद तसेच संस्थेचे सभासद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दहावीचे २२, बारावी १० विद्यार्थी, पदवीधर ७ विद्यार्थी, सभासद पाल्यांचे ११ विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील ५ सत्कार मुर्तीं यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी शिक्षिका उषा खोत यांनी केले तर संस्थेच्या व्हाईस चेअरमन स्नेहा पाटील यांनी आभार मानले.
Post a Comment
0 Comments