* लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगडचे नागरिकांना आवाहन
* शासकीय कामासाठी लाच मागणाऱ्यांविरुद्ध तात्काळ कारवाई
* नागरिकांनी निर्भयपणे संपर्क साधावा - पोलिस उपअधीक्षक सरिता भोसले यांचे आवाहन
अलिबाग / नरेश जाधव :- रायगड जिल्ह्यातील नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रायगड यांच्या वतीने एक महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे. कोणताही शासकीय कर्मचारी किंवा त्याच्या वतीने कोणताही खाजगी इसम शासकीय कामासाठी लाच मागत असेल, तर त्याची तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन विभागाने नागरिकांना केले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारची कोणतीही माहिती मिळताच तात्काळ आणि गुप्तपणे कार्रवाई करण्यात येईल. नागरिकांनी कोणत्याही भीतीशिवाय विभागाशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलिस उपअधीक्षक सरिता भोसले यांनी सांगितले की, लाच देणे आणि घेणे दोन्ही गुन्हा आहे. नागरिकांनी शासकीय काम करताना जर कोणतीही लाच मागणी होत असल्याचे लक्षात आले, तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा. तुमची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल आणि आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या हक्काच्या शासकीय सेवेसाठी कुणालाही पैशांची मागणी करू देऊ नका. एकत्र येऊनच भ्रष्टाचार मुक्त रायगड घडवता येईल.
-: संपर्काची माहिती :-
- कार्यालयाचा पत्ता :-
पोलिस उपअधीक्षक,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रायगड,
अलिबाग गोंधळपाडा, ता. अलिबाग, जि. रायगड
- दूरध्वनी क्रमांक :-
(02141) 222331
- श्रीमती सरिता भोसले, पोलिस उपअधीक्षक (9004374910)
- निशांत धनवडे, पोलिस निरीक्षक - (8108355488)
- नारायण सरोदे, पोलिस निरीक्षक (7977116231)
* विभागाकडून नागरिकांना सूचना :-
1. शासकीय कामासाठी कोणत्याही स्वरूपाची लाच मागणी झाल्यास तात्काळ तक्रार नोंदवा.
2. तक्रार करताना वेळ, ठिकाण आणि संबंधित व्यक्तीची माहिती द्या.
3. तुमची ओळख गोपनीय ठेवली जाईल.
4. विभागाकडून तक्रारीची तात्काळ चौकशी आणि कारवाई करण्यात येईल.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगडचा हा उपक्रम नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणारा आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या हक्कांच्या सेवेसाठी लाच मागणाऱ्यांविरोधात तक्रार करून स्वच्छ प्रशासनाच्या दिशेने पाऊल टाकावे, असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.
Post a Comment
0 Comments