* वाघोशी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सतीश देशमुख यांचा उपक्रम कौतुकास्पद
* लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट, पनवेल यांच्या वतीने वाघोशी ग्रामपंचायतीत नेत्र तपासणी शिबिर
सुधागड / निवास सोनावळे :- लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट, पनवेल यांच्या वतीने वाघोशी ग्रामपंचायत परिसरात नेत्र तपासणी व आरोग्य जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात गरजू व ज्येष्ठ नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम वाघोशी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सतीश नेमाजी देशमुख (पिंट्या) यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला.
* आरोग्य सेवेसाठी सामाजिक बांधिलकीचा आदर्श :- शिबिरात लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल येथील तज्ज्ञ नेत्ररोगतज्ज्ञांनी नेत्र तपासणी केली. अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. नेत्र तपासणीनंतर ज्या नागरिकांना चष्म्याची आवश्यकता होती, त्यांना सतीश देशमुख (पिंट्या) यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
* सतीश देशमुख यांचे सामाजिक कार्याबद्दल जनतेत समाधान :- सतीश देशमुख यांनी यापूर्वीही वाघोशी परिसरात अनेक सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबवले आहेत. समाजातील दुर्बल घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचे त्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न ग्रामस्थांकडून कौतुकास पात्र ठरत आहेत.
या शिबिराला वाघोशी व आसपासच्या भागातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. अनेकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करीत सामाजिक जबाबदारीचे हे उत्तम उदाहरण आहे, असे मत व्यक्त केले. या शिबिरावेळी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, स्थानिक कार्यकर्ते, महिला बचतगट प्रतिनिधी, तरुण मंडळे तसेच लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचे डॉंक्टर व स्वयंसेवक उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments