Type Here to Get Search Results !

कडाव विभागात विलास श्रीखंडे यांचा प्रभाव वाढतोय !

* कडाव जिल्हा परिषद विभागातून सुशिक्षित व सुपरीचित चेहरा म्हणून विलास श्रीखंडे यांचे नाव चर्चेत!

* सर्वसमावेशक नेतृत्वगुण, समाजातील दांडगा जनसंपर्क आणि सामाजिक कार्यामुळे कडाव विभागातील मतदारांचा वाढता कल

कर्जत / प्रतिनिधी :- राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा महाबाजार रंगू लागला आहे. महापालिका, नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तयारीत सर्वच पक्ष झटत असताना, आरक्षणाची यादी जाहीर झाल्याने अनेकांच्या समीकरणांना तडे गेले आहेत. परंतु काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांसाठी नव्या संधींचे दरवाजे उघडले आहेत.


रायगड जिल्ह्यातील कर्जत मतदारसंघातील कडाव जिल्हा परिषद विभागात आरक्षण “नागरिकांचा मागास प्रवर्ग” घोषित झाल्यानंतर, या विभागात एक सुशिक्षित आणि ओळखीचा चेहरा म्हणून पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते विलास श्रीखंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.


काही दिवसांपूर्वीच शासनाच्या माध्यमातून विलास श्रीखंडे यांना कुणबी ओबीसी जात प्रमाणपत्र अधिकृतरीत्या प्राप्त झाले. सकल मराठा समाज बांधवांच्या उपस्थितीत हे प्रमाणपत्र त्यांना प्रदान करण्यात आले होते. या घटनेमुळे आता त्यांना कडाव जिल्हा परिषद विभागातून निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या आरक्षणानुसार त्यांच्या उमेदवारीची शक्यता अधिक बळावली असून, स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये “विलास श्रीखंडे हेच योग्य उमेदवार” अशी मागणी वेगाने वाढत आहे.


विलास श्रीखंडे हे केवळ पत्रकार नाहीत, तर ते एक समाजभान असलेले कार्यकर्ते आहेत. त्यांनी गेली अनेक वर्षे पत्रकारिता, सामाजिक उपक्रम, शिक्षण, क्रीडा आणि अध्यात्मिक कार्य क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावली आहे. पोटल (ता. कर्जत) येथील रहिवासी असलेले श्रीखंडे हे सर्वसामान्य कुटुंबातील असून, त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर स्थानिक समाजात आदराचे स्थान निर्माण केले आहे.


विलास श्रीखंडे यांचा दांडगा जनसंपर्क फक्त मराठा समाजापुरता मर्यादित नसून, विविध जातीधर्म, समाजघटक आणि गावपातळीवरील नागरिकांमध्ये त्यांनी मैत्रीपूर्ण नाते जपले आहे. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांना तरुण वर्ग, शेतकरी आणि सर्वसामान्य मतदार यांचा विश्वास प्राप्त झाला आहे.


कडाव जिल्हा परिषद विभागातील ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांचा एकमुखी सूर आहे की, विलास श्रीखंडे यांनीच या वेळची जिल्हा परिषद निवडणूक लढवावी. ते सुशिक्षित, तळागाळातील आणि सर्व समाज घटकांना जोडणारे नेते आहेत. या मागणीमुळे स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये मोठी हलचल निर्माण झाली आहे.


आरक्षण जाहीर झाल्यानंतर कर्जत मतदारसंघात राजकीय वातावरण रंगले असून, श्रीखंडे यांच्या उमेदवारीमुळे नव्या समीकरणांची पायाभरणी होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यांच्या नावाभोवती निर्माण झालेला सकारात्मक प्रतिसाद पाहता, स्थानिक पातळीवर त्यांना प्रचंड पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Post a Comment

0 Comments