Type Here to Get Search Results !

शुभांगी योगेश गिरीगोसावी यांची लोणावळा नगर परिषद निवडणुकीत दमदार एन्ट्री!

* महिला नेतृत्वाचा नवा अध्याय ; ओबीसी समाजाच्या सबलीकरणासाठी मैदानात उतरणार शुभांगी गिरीगोसावी!

* सेवा, संस्कार आणि विकास,  हाच माझा संकल्प - शुभांगी योगेश गिरीगोसावी

लोणावळा / फिरोज पिंजारी :- लोणावळा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे आणि आता शहराच्या राजकारणात नव्या चेहऱ्याच्या एन्ट्रीने चांगलीच चर्चा रंगली आहे. प्रभाग क्रमांक 1 मधून ओबीसी महिला प्रवर्गातून शुभांगी योगेश गिरीगोसावी या निवडणूक मैदानात उतरणार असल्याची अधिकृत घोषणा झाल्याने लोणावळा शहरातील राजकारणात नवचैतन्य आले आहे.


शुभांगी गिरीगोसावी यांचे नाव जाहीर होताच प्रभागात चर्चा सुरु झाली आहे. लोणावळ्यात आता एक नवे, सुशिक्षित, कार्यक्षम आणि जनतेच्या मनात घर करणारे महिला नेतृत्व उदयास येत आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने नागरिकांशी संवाद साधताना शुभांगी गिरीगोसावी म्हणाल्या की, राजकारण हे माझ्यासाठी सत्तेचे नव्हे, तर सेवेचे माध्यम आहे. महिलांना स्वावलंबी बनवणे, त्यांच्या आवाजाला व्यासपीठ मिळवून देणे आणि प्रभागातील विकासाची गती वाढवणे, हेच माझे ध्येय आहे.


त्यांनी मागील काही वर्षांत सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला असून, महिला उद्योजकतेसाठी प्रशिक्षण, स्वच्छता उपक्रम, शिक्षण क्षेत्रातील मदत आणि कौशल्य विकासासाठीच्या उपक्रमांद्वारे अनेक प्रकल्प राबवले आहेत. त्यामुळे प्रभागात “शुभांगी ताई म्हणजे काम करणाऱ्या नेत्याचे उदाहरण” अशी प्रतिमा तयार झाली आहे.


शुभांगी योगेश गिरीगोसावी या उच्चशिक्षित, विचारशील आणि ठाम विचारांच्या महिला आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीत संस्कार, शिक्षण आणि समाजसेवेचा संगम दिसतो. त्यांचा ठाम विश्वास आहे की, शहराचा विकास फक्त रस्ते व इमारतींनी होत नाही, तर तो नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या विश्वासाने आणि सहभागाने होतो. त्यांनी आपल्या प्रभागात महिला बचत गटांचे बळकटीकरण, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत, आणि युवकांना रोजगाराभिमुख मार्गदर्शन देणारे अनेक प्रकल्प राबविले आहेत.


शुभांगी गिरीगोसावी या पहिल्यांदाच राजकारणाच्या मैदानात उतरल्या असल्या, तरी त्यांची सामाजिक कारकीर्द अनेक वर्षांची आहे. त्यांच्या उत्साही, निडर आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वामुळे प्रभागातील महिला आणि युवक त्यांच्याभोवती एकवटले आहेत. स्थानिक नागरिकांमध्ये एकच चर्चा रंगली आहे. आता प्रभाग क्रमांक 1 मध्ये खऱ्या अर्थाने महिलांच्या नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू होणार आहे. नागरिक, व्यावसायिक, गृहिणी आणि वयोवृद्ध यांच्यात शुभांगी गिरीगोसावी यांना प्रचंड पाठिंबा मिळताना दिसत आहे.


शुभांगी गिरीगोसावी पुढे म्हणाल्या की, माझे ध्येय म्हणजे नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरणे. मी कोणाच्याही विरोधात नाही, पण प्रत्येक सामान्य नागरिकाच्या बाजूने आहे. लोणावळा शहराच्या विकासात माझे योगदान देणे, हीच माझी निवडणूक जिंकण्याची खरी प्रेरणा आहे. या निवडणुकीत गिरीगोसावी यांच्या एन्ट्रीने समीकरणं बदलणार हे स्पष्ट होतंय.


प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिक म्हणतात की, "शुभांगी ताई यांचं बोलणं साधं, पण काम दमदार!” त्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या, सुसंस्कृत आणि खऱ्या अर्थाने समाजाच्या हितासाठी झटणाऱ्या नेत्या आहेत.


शुभांगी योगेश गिरीगोसावी यांची निवडणुकीतली एन्ट्री ही केवळ उमेदवारी नाही, तर लोणावळा शहरात संस्कार, शिक्षण आणि सेवेचे नवं नेतृत्व उदयास येण्याची सुरुवात आहे. त्यांचा अनुभव, तळमळ आणि प्रामाणिक दृष्टिकोन यामुळे प्रभाग क्रमांक 1 मधील निवडणूक अधिक रंगतदार आणि स्पर्धात्मक होणार यात शंका नाही.

Post a Comment

0 Comments