Type Here to Get Search Results !

विकासाच्या रथावर स्वार व्हा !

* गणेश हरिभाऊ लाड दहिवली प्रभाग क्रमांक 2 मधून नगरसेवकपदासाठी सज्ज

* जनतेचा विश्वास आणि सामाजिक कार्याचा ठसा घेऊन गणेश लाड मैदानात

* दहिवलीच्या विकासाचा नवा अध्याय लिहण्याचा निर्धार

कर्जत / नरेश जाधव :- दहिवली परिसरातील लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते गणेश हरिभाऊ लाड यांनी आगामी कर्जत नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधून नगरसेवकपदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. सामाजिक कार्य, लोकाभिमुख दृष्टीकोन आणि विकासाभिमुख विचारसरणीच्या जोरावर गणेश लाड यांनी प्रभागातील जनतेमध्ये एक वेगळा विश्वास निर्माण केला आहे.


* प्रभाग क्रमांक 2 - विविधतेने नटलेला, पण मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम :- दहिवली प्रभाग क्रमांक 2 हा कर्जत शहरातील एक महत्वाचा आणि मोठा प्रभाग आहे. या प्रभागात हायड्रो कॉलनी, सहकार नगर, सेवालाल नगर, कृषी बाजार समिती, पेट्रोल पंप परिसर, यशदा, गिरीवन, संजयनगर, इब्सार कॉलेज परिसर, साईनगर, शिवाजीनगर, बदरीनाथ, आवळा सुपारी, मेघनाथ वैद्य, साळवी वसाहत, बेडेकर गल्ली, डोंबे हायस्कूल परिसर, समर्थ नगर, सुयोग नगर, पुष्पराज, माधव कुंज, अहुजा, निलधे, दळवी, खानविलकर, बच्चूशेठ गिरण, आणि लगतचा भाग यांचा समावेश आहे.


विविध समाजघटक, कामगार, विद्यार्थी, व्यापारी आणि कुटुंबीय या प्रभागात मोठ्या संख्येने राहतात. मात्र आजही रस्ते, पाणीपुरवठा, नाले, सार्वजनिक प्रकाशव्यवस्था आणि वाहतूक या मूलभूत सोयीसुविधांचा प्रश्न कायम आहे. याच समस्यांवर उपाय करण्यासाठी गणेश लाड यांनी जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.


* जनतेचा प्रतिनिधी नव्हे, सेवक म्हणून काम करेन :- गणेश लाड हे गेली अनेक वर्षे सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. ग्राम स्वच्छता, शैक्षणिक उपक्रम, रक्तदान शिबिरे, महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृती आणि स्थानिक विकास योजनांसाठी जनतेबरोबर खांद्याला खांदा लावून काम केल्यामुळे त्यांना प्रभागातील नागरिकांमध्ये “सक्रिय कार्यकर्ता” म्हणून ओळख मिळाली आहे.


त्यांचा ठाम संदेश आहे की, मी सत्तेसाठी नव्हे, सेवेच्या भावनेतून उभा आहे. दहिवली प्रभागाचा प्रत्येक रस्ता, प्रत्येक गल्ली माझ्यासाठी कुटुंबासारखी आहे. लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला, तर हा प्रभाग कर्जत शहराचा आदर्श प्रभाग बनविन.


* गणेश लाड यांच्या प्राधान्यक्रमांमध्ये काय ? :- गणेश लाड यांनी प्रभागातील जनतेसाठी काही ठोस प्राधान्यक्रम जाहीर केले आहेत :

1. स्वच्छ आणि प्रकाशमान दहिवली : प्रत्येक गल्लीपर्यंत एलईडी दिवे, स्वच्छतेची व्यवस्था आणि कचरा व्यवस्थापन सुधारणा.

2. नवीन रस्ते आणि पाणीपुरवठा : जुन्या पाईपलाईनची बदलणी आणि रस्त्यांचे पूर्ण डांबरीकरण.

3. शैक्षणिक सुविधा वाढविणे : विद्यार्थ्यांसाठी मोफत ट्युशन वर्ग, वाचनालय आणि करिअर मार्गदर्शन केंद्र.

4. महिलांसाठी उपक्रम : स्वयंरोजगार प्रशिक्षण, महिला बचतगटांना प्रोत्साहन आणि सुरक्षित सार्वजनिक ठिकाणे.

5. तरुणांसाठी खेळ व रोजगार : मैदानांचे नूतनीकरण, आणि युवा रोजगार मेळावे.

त्यांचा मंत्र स्पष्ट आहे की, विकास म्हणजे फक्त सिमेंटचा रस्ता नव्हे, तर सुरक्षितता, शिक्षण आणि रोजगाराचा हक्क!


* लोकांशी जवळीक, समस्यांवर तत्पर प्रतिसाद :- गणेश लाड यांनी गेल्या काही वर्षांत प्रभागातील प्रत्येक नागरिकाशी संपर्क ठेवला आहे. घरगुती अडचणींपासून ते सामुदायिक प्रश्नांपर्यंत ते स्वतः उपस्थित राहून मदत करतात, निर्णयासाठी पाठपुरावा करतात, आणि सर्व स्तरांवर नागरिकांचा आवाज बनले आहेत.

नागरिकांच्या भाषेत सांगायचे म्हणजे गणेश लाड हे ‘दरवाजा ठोठावताच मिळणारे नगरसेवक’ ठरणार आहेत. आम्हाला हवा तो जमिनीवर काम करणारा प्रतिनिधी आणि तो म्हणजे गणेशभाऊ!


* जनतेचा विश्वास, युवा वर्गाचा पाठिंबा :- दहिवली प्रभागातील युवा वर्ग, महिला संघटना आणि व्यावसायिक मंडळांनी गणेश लाड यांना पाठिंबा दर्शविला आहे. त्यांचा सुलभ स्वभाव, प्रामाणिक संवाद आणि जनतेशी बांधिलकी हेच त्यांच्या प्रचाराचे प्रमुख बळ ठरत आहे. स्थानिक युवांनी “विकासाच्या रथावर स्वार व्हा!” या घोषवाक्याने प्रचार मोहीम सुरू केली आहे.


* दहिवलीचा विकास ठरवणारी निवडणूक :- ही निवडणूक केवळ राजकीय नाही, तर दहिवलीच्या विकासाचा आराखडा ठरवणारी आहे. गणेश लाड यांच्या उमेदवारीमुळे प्रभागातील चर्चांना वेग आला असून, जनतेमध्ये नव्या आशेची किरणे निर्माण झाली आहेत. लोकांचे प्रश्न सोडवण्याची परंपरा आणि न थकणारी कार्यशक्ती यामुळे गणेश लाड हे प्रभाग क्रमांक 2 साठी एक बलाढ्य उमेदवार ठरत आहेत.

Post a Comment

0 Comments