चंद्रपुर / संजय बागडे :- स्थानिक गोविंदराव वारजूकर महाविद्यालय नागभीड येथील ग्रंथालय विभागाच्या वतीने वाचन प्रेरणा दिवस डॉं. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या कार्याचा गौरव करून साजरा करण्यात आला. याप्रसंगी ग्रंथालय विभाग प्रमुख डॉं. चंद्रशेखर हनवंते यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून देतांना, वाचनामुळे जीवन जगण्यातील अभिरुची प्रगल्भ होते. तसेच कल्पनाशक्तीला नवीन आयाम प्राप्त झाल्यामुळे नवीन कलाकृती जन्माला येते, असे विचार त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉं. गणेश सांगोळकर उपस्थित होते. त्यांनी ही आपल्या मार्गदर्शनातून वाचाल तर वाचाल, अशीच वास्तविकता दर्शविली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. मंगेश देवढगले यांनी केले. तर आभार प्रा. डॉं. कापगते यांनी मानले. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉं. संजय सिंग यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला.
Post a Comment
0 Comments