* अध्यक्षपदी बबनराव धायतोंडे, उपाध्यक्षपदी दत्ता पारेकर यांची बिनविरोध निवड
* पत्रकार बांधवांच्या एकजुटीसाठी आणि सामाजिक जबाबदारीच्या पत्रकारितेसाठी संघ सज्ज
* सत्यजित रणवरे व शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात निवड प्रक्रिया पार
इंदापूर / प्रतिनिधी :- इंदापूर तालुका जनसेवा पत्रकार संघाची वार्षिक निवड सभा इंदापूर रेस्ट हाऊस येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेत संघाची नवीन कार्यकारिणी सत्यजित रणवरे आणि शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एकमताने निवडण्यात आली. निवड प्रक्रियेदरम्यान पत्रकार बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
या निवडीत पुढील पदाधिकारी बिनविरोध निवडून आले. अध्यक्ष : बबनराव धायतोंडे, उपाध्यक्ष : दत्तात्रय पारेकर, सचिव : दत्तात्रय मिसाळ, खजिनदार : अरुण भोई, कार्याध्यक्ष : अतुल सोनकांबळे व धनाजी शेंडगे, सहखजिनदार: महेश कळसाईत, प्रसिद्धी प्रमुख : प्रवीण पिसे निवड जाहीर होताच उपस्थितांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात सर्व नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी सत्यजित रणवरे व शिवाजी पवार यांनी नव्या कार्यकारिणीला मार्गदर्शन करताना संघटनात्मक बांधिलकी, पत्रकार बांधवांच्या हितासाठी लढा तसेच सामाजिक जबाबदारी जपणारी पत्रकारिता यावर विशेष भर दिला. नव्या कार्यकारिणीनेही संघाच्या उद्दिष्टांप्रती निष्ठा व्यक्त करीत पत्रकार बांधवांच्या हक्कांसाठी आणि समाजहितासाठी एकजुटीने कार्य करू, असा ठाम निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमानंतर सर्व पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा देत त्यांच्या कार्यकाळात संघ अधिक मजबूत आणि प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला. इंदापूर तालुका जनसेवा पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी ही पत्रकार एकता, पारदर्शकता आणि सामाजिक बांधिलकीचा प्रतीक ठरणार असून, संघ पत्रकार बांधवांच्या प्रश्नांवर ठोस पावले उचलणार, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment
0 Comments