* शेतकरीपुत्र सुनील तावडे यांच्याबाबत गावकऱ्यांना विश्वास - पंचायत समितीत तरुण बुद्धिमान नेतृत्व हवे!
नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- नगरदेवळा गावात येत्या पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक वेगळीच चर्चा रंगली आहे. गावकऱ्यांचा सूर स्पष्ट आहे की, आता गावाच्या विकासासाठी उच्चशिक्षित, तरुण, प्रामाणिक आणि विचारवंत नेतृत्वाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर नगरदेवळा गावातील शेतकरीपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुनील तावडे यांच्याकडे नागरिकांचा ओढा वाढताना दिसत आहे.
सुनील तावडे हे उच्चशिक्षित तरुण नेते असून त्यांची मुळे थेट शेतकऱ्यांच्या मातीत रुजलेली आहेत. ते नगरदेवळा दिगर विकासो सोसायटीचे विद्यमान संचालक म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांनी आपल्या कामकाजातून पारदर्शकता, जबाबदारी आणि ग्रामीण विकासाची दृष्टी दाखवली आहे. गावातील युवक, शेतकरी आणि महिला मंडळी यांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला आहे. त्यांच्या या कामामुळेच अनेक ग्रामस्थ म्हणत आहेत की, सुनील तावडे यांना पंचायत समितीसाठी उमेदवारी द्या, आम्हाला शिक्षित आणि प्रगल्भ नेतृत्व हवे!
नगरदेवळा परिसरातील नागरिकांनी पंचायत समिती निवडणुकीसाठी सुनील तावडे यांचे नाव पुढे आणले आहे. त्यांची गावातील सक्रियता, सामाजिक संवाद आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका यामुळे त्यांना एक सक्षम, तरुण आणि अभ्यासू उमेदवार म्हणून मान्यता मिळत आहे. सुनील तावडे हे गावाचे खरे प्रतिनिधी ठरतील, कारण त्यांना शेतकऱ्यांच्या घामाचा अर्थ आणि तरुणांच्या स्वप्नांची जाण आहे, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये सुनील तावडे हे गावपातळीवर सक्रिय संघटक आणि प्रभावी वक्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला असून, पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती मजबूत करण्यासाठी तावडे यांची भूमिका महत्त्वाची ठरेल, असा पक्षातील सूत्रांचा दावा आहे.
पत्रकारांशी बोलताना तावडे म्हणाले, मी राजकारणात केवळ पदासाठी नाही, तर गावाच्या विकासासाठी आलो आहे. शिक्षण, शेती आणि रोजगार हे माझ्या कार्याचे तीन मुख्य आधारस्तंभ असतील. तरुणाईला दिशा देणारे आणि गावाला विकास देणारे काम करायचे आहे.
आजच्या काळात ग्रामीण भागात तरुण, उच्चशिक्षित आणि तळमळीचे नेतृत्व पुढे येणे ही लोकशाहीची खरी ताकद आहे. नगरदेवळा गावात नागरिकांनी मांडलेली ही मागणी शासन आणि पक्षनेत्यांनी गांभीर्याने घ्यावी. सुनील तावडे यांच्यासारखे तरुण नेतेच ग्रामविकासाला नवी दिशा देऊ शकतात.
Post a Comment
0 Comments