* संगमेश्वर नदीवरील तुटलेल्या पुलाच्या दुरुस्तीची गावकऱ्यांची मागणी
* नाना महाजन यांचा ठाम आवाज “आता विकासच आमचा धर्म!”
नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- संगमेश्वर नदीवरील तुटलेला पूल हा नगरदेवळा गावाच्या वेदनेचा कायमचा विषय बनला आहे. पावसाळ्यात गावातील नागरिकांना जिवंत असतानाही त्रास होतो, आणि कोणत्याही मृत व्यक्तीचा अंत्यविधी संगमेश्वर येथे नेणे म्हणजे संकटावर मात करणे, अशी परिस्थिती आहे.
प्रेत नेण्यासाठी सुद्धा रस्ता नाही, हे दुर्दैव आहे, अशी भावना आता गावकऱ्यांनी उघडपणे व्यक्त केली असून, आगामी पंचायत समिती निवडणुकीत हा विषयच मुख्य विकासाचा अजेंडा ठरणार आहे.
गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, संगमेश्वर नदीवरील पूल फक्त जोडला गेला, तर नगरदेवळा गावाचा चेहरामोहरा बदलून जाईल. पावसाळ्यात पूल पाण्याखाली जातो, गाव अलगद वेगळं होतं, आणि कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी गावकऱ्यांना गंभीर अडचणींना सामोरे जावे लागते. पुलाची उंची वाढेल का नाही, देव जाणे, पण गावातील मृतात्म्यास तरी सुखरूप संगमेश्वर येथे अंतिम संस्कार व्हावेत, एवढंच आम्हाला हवं आहे, असे गावकऱ्यांनी दुःखाने सांगितले.
पंचायत समिती गणासाठी इच्छुक उमेदवार नामदेव विश्राम (नाना) महाजन यांनी या गंभीर प्रश्नावर भाष्य करताना स्पष्ट सांगितले की, आमच्या नगरदेवळा गावातील मृतात्म्यास मेल्यानंतर तरी सुखरूप अंत्यविधीसाठी रस्ता हवा. जिवंत असो वा मृत, दोघांनाही सन्मान मिळायला हवा.
नाना महाजन यांनी गेल्या काही वर्षांत गावात पिण्याचे पाणी, रस्ते, आरोग्य सुविधा अशा अनेक मूलभूत प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविला आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये अशी चर्चा रंगली आहे की, त्यांच्या विकासाभिमुख दृष्टीमुळे आणि जनसंपर्कामुळे नाना महाजन यांना एकदा संधी द्यायलाच हवी. रस्ते, पूल, पाणी आणि शेतकऱ्यांच्या समस्या हे सगळं फक्त नानाच सोडवू शकतात. आगामी पंचायत समिती निवडणुकीत नगरदेवळा गावाचा पूल आणि अंत्यविधी रस्ता हा प्रमुख निवडणूक मुद्दा ठरणार आहे.
नाना महाजन यांनी गावकऱ्यांना आश्वासन दिले की, मी जिंकून आलो, तर हा पूल दुरुस्त करणे आणि त्याची उंची वाढवणे हेच माझे पहिले काम असेल.
गावातील तरुण मंडळी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यातही नानांच्या कामाची चर्चा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘सर्वांसाठी रस्ता, पाण्यासाठी उपाय आणि विकासासाठी निश्चय’ ही घोषणा जोर धरू लागली आहे.
एका गावाचा विकास मोजायचा असेल, तर फक्त रस्ते नाही तर मृत आत्म्यासाठी सुद्धा सुरक्षित मार्ग हवा. नगरदेवळा गावाच्या मागणीला शासनाने आता कान द्यायलाच हवा, आणि जनतेचा आवाज -नाना महाजन यांना पुढे आणणे हे गावाच्या विकासासाठी गरजेचे ठरेल.
Post a Comment
0 Comments