* जळगाव शहरात उघडकीस आला धक्कादायक प्रकार * चार जणांविरुद्ध पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल
जळगाव / प्रतिनिधी :- रेल्वेमध्ये नोकरी मिळवून देण्याचे मोहक आमिष दाखवून एका 67 वर्षीय सेवानिवृत्त नागरिकाची तब्बल 12 लाख 50 हजारांची फसवणूक झाल्याची गंभीर घटना जळगाव शहरात समोर आली आहे. या प्रकरणी 20 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
* चार वर्षांमध्ये करोडोंची स्वप्ने, लाखोंची फसवणूक :- फिर्यादी संतोष माणिक चौधरी (वय 67, रा. निमखेडी शिवार) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, 21 फेब्रुवारी 2021 ते 31 ऑक्टोबर 2025 या जवळपास चार वर्षांच्या कालावधीत आरोपींनी विश्वास संपादन करून त्यांची फसवणूक केली.
शहरातील नवीन बसस्थानकाजवळ चिमुकले राम मंदिर परिसरात आरोपींनी चौधरी यांच्याशी ओळख वाढवून त्यांचा मुलगा जगदिश चौधरी याला रेल्वेत नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. संदिप वसंत भोळे (रा. जिल्हापेठ, जळगाव), दिपाली संदिप भोळे (रा. जिल्हापेठ, जळगाव), धिरज पांडुरंग मुंगलमारे (रा. भंडारा), अण्णा नामदेवराव गोहत्रे (रा. नागपूर) या चौघांनी मिळून चौधरी यांच्या कुटुंबाचा विश्वास संपादन करून विविध मार्गांने रक्कम गोळा केली.
* 15 लाख रुपये घेतले, नोकरी मात्र ‘हवेतील किल्ले’ :- आरोपींनी नोकरी मिळवून देण्याच्या खोट्या आश्वासनासाठी रोख तसेच ऑनलाईन व्यवहारातून तब्बल 15 लाख रुपये स्विकारले. यामध्ये 12.50 लाखांची अधिकृत फसवणुकीची नोंद करण्यात आली असून, उर्वरित रक्कम तपासात स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार फसवणूक व विश्वासघाताच्या कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, जिल्हापेठ पोलिस आरोपींच्या शोधासाठी पुढील तपास सुरू केला आहे.

Post a Comment
0 Comments