Type Here to Get Search Results !

कलाछंद ड्रॉइंग क्लासची विद्यार्थिनी उन्नती पाटीलचे चित्र थेट राष्ट्रीय स्तरावर

* उज्जैनमधील ‘राष्ट्रीय कालिदास चित्र - मूर्तिकला प्रदर्शनात’ मानाचा प्रवेश

* देशभरातील केवळ ८० कलाकारांमध्ये उन्नतीची निवड - महाराष्ट्रातून फक्त ४ जणांचा सहभाग

* इयत्ता 12 वीतील विद्यार्थिनीचा अभिमानास्पद पराक्रम

पाचोरा / प्रतिनिधी :- पाचोरा येथील कलाछंद ड्रॉइंग क्लासची उन्नती नितीन पाटील हिने रेखाटलेल्या ‘प्रेम प्रसंग’ या शीर्षकाखालील चित्राची प्रतिष्ठित राष्ट्रीय कालिदास चित्र - मूर्तिकला प्रदर्शन, उज्जैन (मध्यप्रदेश) येथे राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. देशभरातून केवळ 80 कलाकारांच्या निवडक कलाकृती या प्रदर्शनासाठी पात्र ठरल्या असून त्यात महाराष्ट्रातून फक्त 4 नामांकित कलाकारांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे, त्यात इयत्ता 12 वीची विद्यार्थिनी उन्नती ही देखील सहभागी झाली असून तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


* प्रेम प्रसंग - ऐक्रेलिक माध्यमातील अप्रतिम कलाकृती :- उन्नतीने हे चित्र ऐक्रेलिक माध्यमात साकारले असून यातील कथा ‘मालकविकाग्नी’ या प्रेयसीभोवती फिरते. मुघल व राजस्थानी या दोन्ही शैलींना सुरेखपणे एकत्र आणत उन्नतीने आपल्या कल्पनाशक्ती, नजाकत आणि कुशलतेने या चित्राला अप्रतिम रूप दिले आहे. तिच्या चित्रातील तपशील, रंगसंगती आणि भावविश्वाने परीक्षक मंत्रमुग्ध झाले.


* राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक सन्मानांची छाप :- यापूर्वीही उन्नतीच्या चित्रांची निवड राज्य व राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये झाली असून तिला विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. कला क्षेत्रातील तिची प्रगती सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय आहे.


उन्नतीला निर्मल इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा येथील कलाशिक्षक व नामांकित रांगोळीकार शैलेश कुलकर्णी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. ती निर्मल इंटरनॅशनल स्कूलची माजी विद्यार्थिनी असून गजानन डेअरी, पाचोराचे संचालक आबाजी तुकाराम पाटील (अंतुर्ली) यांची नात व नितीन दादाजी पाटील यांची कन्या आहे.


* खान्देशाचा गौरव - पाचोराचा अभिमान :- उन्नतीच्या या भव्य यशामुळे संपूर्ण खान्देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पाचोरा तालुक्याची व शहराची कला क्षेत्रातील उपस्थिती अधोरेखित करणारा अभिमानाचा क्षण असल्याचे स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले.


Post a Comment

0 Comments