Type Here to Get Search Results !

15 हजारांची लाच स्विकारताना जळगाव बांधकाम विभागाचा अधिकारी धुळे एसीबीच्या जाळ्यात

* पेट्रोल पंपासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या बदल्यात मागितली लाच

जळगाव / प्रतिनिधी :- पेट्रोल पंपासाठी नाहरकत प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या बदल्यात 15 हजारांची लाच स्विकारताना जळगाव येथील सार्वजनिक बांधकाम (Building & Construction) विभागातील अधिकारी वासूदेव धोंडू पाथरवट (53) हे धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाच्या सापळ्यात रंगेहाथ अडकले. ही कारवाई सोमवार, 24 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारच्या सुमारास करण्यात आली. या घटनेमुळे बांधकाम विभागात मोठी खळबळ उडाली आहे.


* काय आहे प्रकरण ? :- तक्रारदाराने पेट्रोल पंपासाठी नाहरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अर्ज दाखल केला होता. प्रकरण लवकर निकाली न निघाल्याने तक्रारदार आणि त्यांचे सहकारी कार्यालयात वारंवार संपर्क साधू लागले. या दरम्यान आरेखक वासुदेव पाथरवट यांनी सुरुवातीला ₹2,000 फाईल चालवण्यासाठी आणि काम पूर्ण करून प्रमाणपत्र देण्यासाठी ₹15,000 लाच म्हणून मागितल्याचा आरोप आहे. लाच देण्यास नकार देत तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार दाखल केली.


* एसीबीची शास्त्रशुद्ध कारवाई :- तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर एसीबीने तंत्रज्ञानाधारित पद्धतीने सापळा रचला. निश्चित ठिकाणी व्यवहार होत असताना पाथरवट यांनी ₹15,000 स्विकारताच एसीबी (ACB) च्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. घटनेनंतर आरोपीच्या सामानावर पंचनामा करण्यात आला.


घटनेनंतर रात्री उशिरा जिल्हापेठ पोलिस ठाण्यात पाथरवट यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जळगाव कार्यालयातील लाच मागणीचा प्रकार उघडकीस आल्याने विभागातील इतर कर्मचाऱ्यांमध्येही ऐनवेळी हलचल निर्माण झाली आहे.


Post a Comment

0 Comments