Type Here to Get Search Results !

खोपोली नगरपरिषद निवडणूक 2025 : आज परिवर्तन विकास आघाडीची उमेदवारी अर्ज दाखल रॅली

* नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉं. सुनील गोटीराम पाटील अर्ज दाखल करणार ; मोठ्या शक्तीप्रदर्शनाची अपेक्षा

खोपोली / फिरोज पिंजारी :- खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि शेकाप परिवर्तन विकास  आघाडीने उद्या सोमवार, 17 नोव्हेंबर रोजी नगराध्यक्षासह नगरसेवक पदाच्या आपल्या उमेदवाराचा अर्ज दाखल करण्याची घोषणा केली आहे.

आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार डॉं. सुनील गोटीराम पाटील आपला नामनिर्देशन अर्ज दाखल करणार असून त्यांच्यासह सर्व नगरसेवक पदांचे उमेदवारही अर्ज सादर करणार आहेत. या रॅलीदरम्यान भव्य शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.


* छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून रॅलीला सुरुवात :-सोमवार, 17 नोव्हेंबर 2025  रोजी सकाळी 10.30 वाजता रॅली आणि अर्ज दाखल कार्यक्रमासाठी आघाडीतील कार्यकर्त्यांनी मोठी तयारी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, शिळफाटा, खोपोली येथे उमेदवार व पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र येऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे अर्ज दाखल करण्यासाठी रवाना होतील. तरी उपस्थितीचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) खोपोली शहर  अध्यक्ष मनीष यादव, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खोपोली शहर प्रमुख अंकुश पवार, शेतकरी कामगार पक्ष खालापूर तालुका चिटणीस किशोर पाटील,  राष्ट्रवादी काँग्रेस यांनी केले आहे.


* डॉ. सुनील पाटील - प्रमुख नगराध्यक्ष उमेदवार :- डॉं. सुनील गोटीराम पाटील हे खोपोली शहरातील परिचित सामाजिक कार्यकर्ते, माजी नगराध्यक्ष असून परिवर्तन विकास आघाडीने त्यांच्यावर नगराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. प्रचार यंत्रणा, मतदार संपर्क, आणि आघाडी समन्वय यात त्यांचा सक्रिय सहभाग असून पक्षाध्यक्षांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आहे.


* परिवर्तन विकास आघाडीकडून दमदार शक्ती प्रदर्शनाची चिन्हे :- शहरात आधीच निवडणुकीची रणधूमाळी सुरू असून आजच्या रॅलीमुळे परिवर्तन विकास आघाडीची ताकद अधिक ठळकपणे समोर येण्याची शक्यता आहे. नगराध्यक्ष पदासाठीच्या प्रमुख लढतीत हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments