Type Here to Get Search Results !

सातव्या दिवशीही नामनिर्देशनांचा ओघ कायम

* भडगाव नगर परिषद निवडणूक 2025 : नगराध्यक्षा पदासाठी दोन अर्ज

* नगरसेवक पदासाठी 25 अर्ज दाखल - अंतिम क्षणी राजकीय समीकरणे तापली

भडगाव / प्रतिनिधी :- भडगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आज नामनिर्देशन दाखल करण्याचा सातवा दिवस असून उमेदवारांकडून अर्ज सादरीकरणाचा उत्साह कायम आहे. शहरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापत चालले असून राजकीय पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे.


नगराध्यक्षा पदासाठी सुशिला शांताराम पाटील यांच्या दोन अर्जांमुळे उत्सुकता वाढली आहे. आज नगराध्यक्षा पदासाठी सुशिला पाटील यांनी दोन अर्ज दाखल केले असून एक भाजप उमेदवार म्हणून तर दुसरा अपक्ष उमेदवार म्हणून दाखल केला. या अनोख्या घडामोडीमुळे शेवटच्या क्षणी पक्षांतर्गत काय समीकरणे बदलणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अधिकृत एबी फॉर्म पत्र येईपर्यंत नगराध्यक्षा पदाचे चित्र अनिश्चित राहणार आहे.


* नगरसेवक पदासाठी 25 अर्ज दाखल :- आज विविध प्रभागांतून नगरसेवक पदासाठी 25 अर्ज दाखल झाले. पक्षातील तिकीट वाटपाबाबतची अनिश्चितता लक्षात घेता अनेक संभाव्य उमेदवारांनी सुरक्षिततेसाठी दोन - दोन अर्ज (पक्षीय व अपक्ष) दाखल केले आहेत.


* प्रभागनिहाय दाखल झालेले अर्ज :-

प्रभाग 1 ब : पाटील मनोहर रामराव (भाजपा).

प्रभाग 2 अ : पाटील मिनाक्षीबाई नारायण (भाजपा), शिरसाठ महेश राजेंद्र (अपक्ष), मोरे भूषण दत्तात्रय (अपक्ष).

प्रभाग 2 ब : पठाण खालेदाबी नासिरखान (भाजपा/अपक्ष), वाघ रंजनाबाई अनिल (शिवसेना/अपक्ष), मोरे चैताली जगन्नाथ (शिवसेना/अपक्ष).

प्रभाग 4 ब : ततार महेंद्र वसंत (शिवसेना).

प्रभाग 5 अ : पाटील कविता सोमनाथ (भाजपा).

प्रभाग 5 ब : पवार जितेंद्र भास्करराव (भाजपा).

प्रभाग 6 अ : येवले योगिता शशिकांत (शिवसेना), पाटील आशाबाई रंगनाथ (भाजपा).

प्रभाग 8 ब : पाटील प्रमोद हेमराज (शिवसेना).

प्रभाग 9 अ : मालपुरे निलेश दत्तात्रय (भाजपा).

प्रभाग 9 ब : पाटील वैशाली विशाल (शिवसेना).

प्रभाग 10 अ : पाटील प्रविन वसंत (भाजपा/अपक्ष), पाटील राजेंद्र महादू (शिवसेना).

प्रभाग 10 ब : बोरसे कुसुम सुभाष (भाजपा), पाटील हर्षा विठ्ठल (भाजपा).

प्रभाग 11 अ : ब्राम्हणे ज्ञानेश्वर देवराम (शिवसेना).

प्रभाग 12 ब : महाजन वैशाली संतोष (शिवसेना).


* एकूण नामनिर्देशनांचा आढावा :- 

नगराध्यक्षा पदासाठी उमेदवार : 3

दाखल झालेले एकूण अर्ज : 4

नगरसेवक पदासाठी उमेदवार : 39

दाखल झालेले एकूण अर्ज : 44

ही वाढती संख्या पाहता संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अत्यंत चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.


आतापर्यंत कोणत्याही पक्षाने अधिकृत एबी फॉर्म पत्र जमा केलेली नसल्याने अनेक उमेदवारांची निष्ठा आणि अंतिम पक्षनिश्चिती अधांतरी आहे. पुढील काही तासांत पक्षांतर्गत बैठकांना वेग येणार असून तिकीट वाटपातील समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


* उद्या अंतिम दिवस - शेवटच्या क्षणी उमेदवारांची धावपळ वाढणार :- उद्या, 17 नोव्हेंबर 2025 हा नामनिर्देशनाचा शेवटचा दिवस असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे. उद्या कोण कोण रिंगणात उतरणार यावरच भडगाव नगर परिषदेची खरी चित्ररचना निश्चित होईल.


Post a Comment

0 Comments