* नगराध्यक्षपदासाठी आतापर्यंत 4 अर्ज ; नगरसेवक पदासाठी तब्बल 64 अर्ज
* उद्या अंतिम दिवस, अर्ज दाखल करण्यासाठी मोठी धावपळ अपेक्षित
खोपोली / फिरोज पिंजारी :- खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी नामनिर्देशन दाखल करण्याच्या सातव्या दिवशी अर्जांचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शहरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून उमेदवार व कार्यकर्त्यांची हालचाल दिवसभर जोमात सुरू होती.
10 नोव्हेंबर रोजी अर्ज दाखल प्रक्रिया सुरू झाली असली तरी 10, 11 व 12 नोव्हेंबर रोजी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नव्हता. मात्र पुढील दिवसांत अर्जांची संख्या झपाट्याने वाढू लागली. 13 नोव्हेंबर 2025 एकूण अर्ज : 2, 14 नोव्हेंबर 2025 एकूण अर्ज : 6 (त्यात नगराध्यक्ष : 1, नगरसेवक : 5), 15 नोव्हेंबर 2025 एकूण अर्ज : 13 (त्यात नगराध्यक्ष : 2, नगरसेवक : 11) आणि आज 16 नोव्हेंबर 2025 एकूण अर्ज : 47 (त्यात नगराध्यक्ष : 1, नगरसेवक : 46) असे आतापर्यं नगरसेवक पदासाठी एकूण 64 अर्ज व नगराध्यक्ष पदासाठी एकूण 4 अर्ज दाखल झाले आहेत.
* नगराध्यक्षपदासाठीचे प्रमुख उमेदवार :- आतापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी खालील 4 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात तौफिक कर्जीकर (काँग्रेस), डॉ. रियाज पठाण (आम आदमी पार्टी), अनिल वाघमारे (अपक्ष) व पत्रकार किशोर साळुंके (अपक्ष) यांचा समावेश आहे.
* उद्या महत्त्वाचा दिवस - अनेक पक्ष अर्ज दाखल करणार :- उद्या, 17 नोव्हेंबर 2025, हा नामनिर्देशनाचा शेवटचा दिवस असून अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे. उद्या शिवसेना - भाजप - आरपीआय महायुती व राष्ट्रवादी (अजित पवार गट) + शिवसेना (उद्धव ठाकरे गट) - परिवर्तन विकास आघाडी, काँग्रेस, आम आदमी पार्टी व अनेक अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत.
* प्रभागांमध्येही चुरस वाढली :- प्रभाग 13 मधून मुमताज अल्ताफ मंसुरी (आम आदमी पार्टी) व प्रभाग 10 मधून पत्रकार शिवाजी जाधव यांचे सुपुत्र सुशांत शिवाजी जाधव (अपक्ष) हे उमेदवारही उद्या अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
नगराध्यक्ष पदाची मुख्य लढत कुलदिपक शेंडे (शिवसेना शिंदे गट - महायुती) व डॉं. सुनील पाटील (राष्ट्रवादी अजित गट - ठाकरे सेना आघाडी) यांच्यात होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
* दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज स्वीकृती - मगच स्पष्ट होईल अंतिम मैदान :- उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्यास परवानगी आहे. त्यानंतरच कोण कोण अंतिम रिंगणात उतरत आहे, याचे स्पष्ट चित्र समोर येणार आहे. खोपोलीत निवडणुकीचे वातावरण शिगेला पोहोचले असून शहरातील सर्वच राजकीय आघाड्यांनी शक्ति प्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे.

Post a Comment
0 Comments