* राष्ट्रवादी अजित पवार गट - ठाकरे शिवसेना एकत्र
* नगराध्यक्षासह 22 उमेदवारांचे अर्ज दाखल
कर्जत / विशेष प्रतिनिधी :- कर्जत नगर परिषद निवडणुकीत परिवर्तन विकास आघाडीने आज अभूतपूर्व शक्ती प्रदर्शन करीत नगराध्यक्षपदासह 22 उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि ठाकरे गट शिवसेना प्रथमच मोठ्या व्यासपीठावर एकत्र आल्याने कर्जत शहरात उत्साह, गर्दी आणि घोषणांचा महापूर उसळला होता.
* धापया मंदिर दर्शनानंतर दमदार रॅलीला सुरुवात :- नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पुष्पा दगडे यांच्यासह सर्व नगरसेवक उमेदवारांनी धापया मंदिरात दर्शन घेतल्यावर रॅलीला प्रारंभ झाला. मुख्य बाजारपेठ, पाटील आळी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पांजली अर्पण करीत मिरवणूक पुढे सरकली. ढोल-ताशांचा निनाद, भगवे-निळे झेंडे आणि उत्साहाच्या लाटा अशा वातावरणात हे शक्ती प्रदर्शन झाले. रॅली अखेर नगर परिषद कार्यालयात दाखल झाली आणि निवडणूक निर्णय अधिकारी डॉं. धनंजय जाधव यांच्याकडे एकूण 22 अर्ज दाखल करण्यात आले.
* आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती :- या ऐतिहासिक प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट) चे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, ठाकरे शिवसेना उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष नितीन सावंत यांच्यासह दोन्ही पक्षांचे अनेक पदाधिकारी, युवानेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* उद्याची महायुती रॅली चर्चेचा विषय :- दरम्यान, उद्या शिवसेना - भाजप - आरपीआय (RPI) महायुतीकडून उमेदवारांचे अर्ज दाखल होणार आहेत. परिवर्तन आघाडीच्या आजच्या भव्य रॅलीपेक्षा त्यांची रॅली मोठी ठरणार का ? याकडे संपूर्ण कर्जतकरांचे लक्ष लागले आहे. कर्जतमध्ये निवडणूक वातावरण चांगलेच तापले असून दोन्ही आघाड्यांमध्ये चुरशीची लढत होण्याचे संकेत मिळत आहेत.

Post a Comment
0 Comments