खालापूर / प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे आणि खोपोली शहराध्यक्ष मनेश यादव यांच्याकडून उमर राजपूत यांची खालापूर तालुका उपाध्यक्ष, तर सागर जाधव खोपोली शहर उपाध्यक्ष पदी नियुक्ती करून नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या नियुक्तीप्रसंगी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, प्रदेश उपाध्यक्ष व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉं. सुनील पाटील, अश्विनीताई पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
नवीन जबाबदारी स्विकृत करताना दोन्ही उपाध्यक्षांनी पक्षवाढीसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. पार्टीच्या आगामी निवडणूक तयारीला या नियुक्त्यांमुळे नवे बळ मिळाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Post a Comment
0 Comments