* कर्मचाऱ्यांकडून सत्कारपूर्वक निरोप
* 12 वर्षांच्या उत्कृष्ट सेवेला सलाम
नांदेड / प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) नांदेड आगारात कार्यरत असलेले यांत्रिक विजय एकनाथराव डाखोरे पाटील पळसगावकर यांची विनंती बदली परभणी विभागात झाल्याने त्यांचा 16 नोव्हेंबर 2025 रोजी कार्यमुक्तीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रसंगी कामगार - कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करीत शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि भेटवस्तू देऊन त्यांना मनापासून निरोप दिला.
* सत्कार सोहळ्यात अधिकारी व सहकाऱ्यांची उपस्थिती :- सत्कार कार्यक्रमास आगाराचे चार्जमन संदीप बोधनकर, पाळी प्रमुख कैलास वाघमारे, संजय खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते. सहकाऱ्यांनी त्यांना पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एसटी मेकॅनिक तसेच महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले.
* 12 वर्षांची उत्कृष्ट सेवा - आदर्श कार्यकर्त्याचे गौरवपूर्ण योगदान :- आपल्या प्रास्ताविक भाषणात मिसलवाड म्हणाले की, विजय डाखोरे पाटील यांनी 2011 पासून एसटीच्या प्रवासी सेवेत कार्यरत राहून आतापर्यंत 12 वर्षे निष्ठा, परिश्रम आणि कौशल्याने सेवा बजावली. हदगाव डेपोमध्ये 1 वर्ष, विभागीय कार्यशाळा नांदेडमध्ये 5 वर्षे आणि नांदेड आगारात 6 वर्षे कार्यरत राहून त्यांनी संस्थेच्या प्रगतीत उल्लेखनीय योगदान दिले.
ते पुढे म्हणाले की, प्रवासी सेवेबरोबरच त्यांनी आधुनिक पद्धतीने फुल उत्पादन करीत कृषी क्षेत्रातही मोठी प्रगती केली आहे. त्यामुळे मी त्यांना ‘शेतकरी मेकॅनिक’ म्हणतो. सभागृहात या उल्लेखावर टाळ्यांचा कडकडाट झाला.
* निरोप सोहळा भावनिक :- या कार्यक्रमाला एसटीचे अधिकारी - कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्य उपस्थित मान्यवरांमध्ये गिरीष कुलकर्णी, गणेश शिंदे, प्रसाद गोंदगे, शेख आलीम, देविदास महाजन, गजानन जाधव, शेख बशीर, दीपक भंडारे, मंगेश झाडे, संदीप भरांडे, चंद्रकांत कल्याणकर, नागनाथ करेवाड, राजू घंटे आदींचा समावेश होता. रामप आगारातील कामगार - कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिल्याने निरोप सोहळा भावनिक वातावरणात पार पडला.
* परभणी विभागात नव्या अध्यायाची सुरुवात :- समारोपाप्रसंगी सहकाऱ्यांनी विजय डाखोरे पाटील यांच्या पुढील सेवेसाठी शुभेच्छा व्यक्त करीत आपण जिथे जाल तिथे उत्कृष्ट कामगिरीचा ठसा उमटवाल, असा विश्वास व्यक्त केला. नांदेड आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांना निरोप देताना त्यांची सेवाभावना, शिस्त आणि कामावरील निष्ठा यांचा विशेष उल्लेख केला.

Post a Comment
0 Comments