Type Here to Get Search Results !

कासोदाचे शायर अहमद रजा खान फिरोज खान ‘लाल बहादुर शास्त्री उर्दू साहित्य सेवा राष्ट्रीय पुरस्कारा'ने सन्मानित

* आदिल शाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य ॲंड. सलीम पटेल यांच्या हस्ते गौरव

कासोदा / फिरोज पिंजारी :- कासोदा शहरातील नामांकित शायर आणि ‘रजा कॉम्प्युटर’चे प्रोप्रायटर अहमद रजा खान फिरोज खान यांना उर्दू साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री उर्दू साहित्य सेवा राष्ट्रीय स्तरीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. आदिल शाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाचे प्रतिष्ठित सिनेट सदस्य ॲंड. सलीम पटेल यांच्या शुभहस्ते त्यांचा सन्मान झाला.

* साहित्यसेवेसाठी मिळाले पाचवे राष्ट्रीय पारितोषिक :- उर्दू साहित्य क्षेत्रातील त्यांची स्वतंत्र शैली, सामाजिक भान असलेली शायरी आणि सातत्यपूर्ण रचनात्मक कार्यामुळे अहमद रजा खान यांना राज्यभरात आणि देशभरात मान मिळत आहे. हे त्यांचे आतापर्यंतचे पाचवे राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिक आहे. अलीकडेच, एशिया हिंदी न्यूज, औरंगाबाद यांच्या वतीने त्यांना ‘आदर्श शायर’ आणि ‘आदर्श पत्रकार’ पुरस्कार देण्यात आला होता.


या भव्य सन्मान सोहळ्यात अनेक मान्यवर उपस्थित होते. आदिल शाह फारुकी बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष फारूक शाह नोमानी, सरदार सरोवर प्रकल्प, नंदुरबार उपजिलाधिकारी मनोज देशमुख, मनपा जळगाव प्रशासन अधिकारी खलील अहमद शेख, शांतिलाल पवार, संभाजी जगन्नाथ पाटील, देवेंद्र पाटील, किशन नाना डोंगरे, अब्दुल मजीद जकरिया तसेच संस्थेची संपूर्ण टीम उपस्थित होती.


* कासोदाचा अभिमान ठरलेले शायर :- अहमद रजा खान यांनी साहित्य क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे कासोदा शहराचे नाव राज्यभर उज्ज्वल झाले आहे. त्यांच्या शायरीतील नैतिकता, सामाजिक संदेश आणि मनाला भिडणारी शैली यामुळे त्यांच्या चाहत्यांची संख्या सतत वाढत आहे. या सन्मानामुळे कासोदा शहरासह संपूर्ण प्रदेशात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या पुढील साहित्य प्रवासासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments