* हस्ताक्षर, निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धेत उर्दू विभागातील 35 विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- जळगांव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ आयोजित जिल्हास्तरीय विद्यासमिती स्पर्धेत नगरदेवळा (ता. पाचोरा) येथील सरदार एस. के. पवार माध्यमिक विद्यालयाच्या उर्दू विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या स्पर्धांमध्ये हस्ताक्षर स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा यांचा समावेश होता.
या स्पर्धेत गट 1 : इयत्ता 5 वी ते 7 वी - 20 विद्यार्थी सहभागी तर गट 2 : इयत्ता 8 वी ते 10 वी 15 विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करीत उर्दू विभागाची शैक्षणिक ताकद प्रभावीपणे दाखवून दिली.
विद्यार्थ्यांच्या सहभागाबद्दल ग्राम शिक्षण समिती नगरदेवळा संचलित सरदार एस. के. पवार विद्यालय नगरदेवळा संस्थेचे व्हा. चेअरमन सुभाष थेपडे, मानद सचिव शिवनारायण जाधव तसेच संचालक किशोर पाटील, वामन पाटील, जगन पाटील, अब्दुल गनी सेठ, नत्थु पाटील, शाळेचे मुखाध्यापक किरण काटकर सर व शाळेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना सादीक सर, जाकीर अली सर, इरम मॅडम यांनी मार्गदर्शन केले तसेच इकबाल सर, कलीम सर, एहतेशाम सर, जहांगीर सर, वकार सर, अफरोज सर, मोहसीन सर यांनीही स्पर्धा तयारीसाठी मोठे योगदान दिले. स्पर्धेसाठी सादीक सरांनी विशेष मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. विशेषतः सादिक सरांनी घेतलेली मेहनत विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देणारी ठरली.
उर्दू विभागातील विद्यार्थ्यांच्या सहभागाने केवळ शाळेचेच नव्हे तर नगरदेवळा गावाचेही नाव जिल्ह्यात उजळले आहे. स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि शिक्षकांचे मार्गदर्शन हे यशाचे प्रमुख घटक ठरले.

Post a Comment
0 Comments