* गोर-गरिबांची सेवा हेच आमचे धर्मकार्य ; सात वर्षांची अखंड परंपरा - आता आठव्या वर्षात प्रवेश
अकोला / प्रतिनिधी :- मानव सेवा फाऊंडेशन सामाजिक व सार्वजनिक मंडळाच्या वतीने आयोजित अन्नदान उपक्रम 22 नोव्हेंबर 2025, शनिवार रोजी लेडी हार्डिंग हॉस्पिटल, अकोला येथे संपन्न झाला. नोव्हेंबर 2018 मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाला आज सात वर्षे पूर्ण झाली असून, सर्वांच्या सहकार्याने संस्था आता आठव्या वर्षात पदार्पण करत आहे.
* सातत्याने सेवापथावर वाटचाल :- मानव सेवा फाऊंडेशन अकोला येथे दर शनिवारी सकाळी 9 वाजता गोर-गरिबांना, रुग्णांच्या नातेवाईकांना आणि गरजू भाऊ-बहिणींना प्रेमाने अन्नदान करत असते. मानवीयतेच्या सेवेची ही परंपरा संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेमुळे आणि समाजातील दातृत्वशील व्यक्तींच्या सहकार्यामुळे अधिक बळकट होत आहे.
हिवाळ्याच्या काळात संस्था ब्लँकेट वाटप, उबदार चादरी आणि लोकर टोपी वितरण करण्यात येते. रस्त्याच्या कडेला झोपलेल्या बेघर आणि हितग्राही बांधवांना करीत असते. या सेवाकार्यातून अनेकांच्या जीवनात उब आणि आशेचा किरण पोहोचत आहे.
* अविनाश पाटील यांच्या हस्ते अन्नदान :- आजच्या अन्नदान कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर होते. कोराडी विद्युत प्रकल्पाचे माजी वरिष्ठ अभियंता अविनाश पाटील यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले. यावेळी त्यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याची मन:पूर्वक प्रशंसा केली आणि मानव सेवा फाऊंडेशनची सेवाभावाची वृत्ती समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे उद्गार काढत सक्रिय सदस्यांना शुभेच्छाही दिल्या.
कार्यक्रमास अविनाश जी पाटील (मुख्य अभियंता - कोराडी), राजेश धनगावकर, विवेक सातपुते सर, भाला जी, राहुल खंडाळकर, कैलास खरात, सिद्धार्थ इंगळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर संस्थेच्या वतीने विवेक सातपुते यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
* हिवाळ्यात ब्लँकेट वितरण :- मानव सेवा फाऊंडेशन या महिन्यात शहरातील गरजू बांधवांना ब्लँकेट वाटप करणार आहे. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी संस्थेच्या दिलेल्या सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘मानवतेची सेवा म्हणजेच सर्वोच्च धर्म’ या भावनेने काम करणाऱ्या मानव सेवा फाऊंडेशनचे कार्य निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी आहे.

Post a Comment
0 Comments