* राष्ट्रीय अचीव्हर अवॉंर्ड 2025 मध्ये केंद्रीय मंत्री श्रीपद नाईक व दिग्गज दिग्दर्शक मेहुल कुमार यांची उपस्थिती
* शोथीम प्रोडक्शन आणि स्वदेश न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत प्रतिभांचा गौरव ; विविध क्षेत्रातील व्यक्तींना राष्ट्रीय पातळीवरील सन्मान
मुंबई / प्रतिनिधी :- शोथीम प्रोडक्शन आणि स्वदेश न्यूज यांच्या संयुक्त आयोजनात राष्ट्रीय अचीव्हर अवॉर्ड 2025 चा दुसरा भव्य सोहळा मुंबईच्या अंधेरी (पूर्व) येथील हॉटेल रेडिसन येथे संपन्न झाला. 2024 पासून सुरू असलेल्या या वार्षिक पुरस्कार सोहळ्याचा उद्देश म्हणजे आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय पातळीवर गौरविणे व समाजातील त्यांच्या योगदानाचा सन्मान करणे.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी केंद्रीय मंत्री श्रीपद नाईक (भारत सरकार - नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्य मंत्री), लोकप्रिय बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक मेहुल कुमार होते. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड, संगीत, रिअल इस्टेट, फॅशन, साहित्य, सोशल वर्क आणि मीडिया अशा विविध क्षेत्रातील प्रथितयश व्यक्तींना गौरविण्यात आले.
* बॉलिवूड क्षेत्रातील पुरस्कार :-
- कीर्ती कुमार - सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
- टीनू वर्मा - “गदर 2” साठी सर्वोत्कृष्ट अॅक्शन दिग्दर्शक
- नताशा फर्नांडिस - “अंदाज 2” मधील उत्कृष्ट नकारात्मक भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
- निकिता रावल - ग्लॅमरस अभिनेत्री पुरस्कार
- काजल पिसल - सर्वोत्कृष्ट फोटोजेनिक टीव्ही अभिनेत्री
- अर्सिया शर्मा - अमेरिकन आयडल स्पर्धक, “मंगल लक्ष्मी” अभिनेत्री – यंग आयकॉन 2025
* संगीत क्षेत्र :-
- शैलेंद्र बर्वे - सर्वोत्कृष्ट संगीतकार व दिग्दर्शक
* रिअल इस्टेट क्षेत्र :-
- सागर विश्वावाडिया - सर्वोत्कृष्ट रिअल इस्टेट इन्फ्लुएंसर
- अरविंद घेवडे - रिअल इस्टेटमधील अग्रगण्य व्यावसायिक
* फॅशन, कला व साहित्य :-
- मितेश उपाध्याय (ब्लॅक पर्ल) - सर्वोत्कृष्ट वस्त्र डिझायनर कंपनी
- दिव्यांश राणा - सर्वोत्कृष्ट हृदयस्पर्शी कवी
- वैदेही प्रीतम - सर्वोत्कृष्ट प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट
- रोशनी महात्रे - सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख अभिनेत्री व मॉडेल
- दीपक देशाई - सर्वोत्कृष्ट लेखक, कवी व गीतकार
* एनजीओ आणि मीडिया क्षेत्रातील पुरस्कार :-
- अमृता मिश्रा (Be Bold Foundation) - सर्वोत्कृष्ट एनजीओ
- डॉं. अविना पी. सकुंडे - सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय एनजीओ (अंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संस्था)
- योगेश लखानी (ब्राईट आउटडोअर मीडिया) - सर्वोत्कृष्ट आउटडोअर मीडिया संस्था
- डॉं. खुशी गुरुभाई - "परफेक्ट वुमेन" मासिकासाठी सर्वोत्कृष्ट महिला मासिक
- श्याम सिंघानिया - "फिल्म्स टुडे" सर्वोत्कृष्ट फिल्म मासिक
या सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यासाठी शोथीम प्रोडक्शनच्या संचालिका सिया, तसेच इरफान आणि संपूर्ण टीमने परिश्रम घेतले. या संकल्पनेचे शिल्पकार शोथीम प्रोडक्शनचे एमडी आणि स्वदेश न्यूज (महाराष्ट्र - गोवा) चे ब्युरो चीफ संजीव कुमार होते. स्वदेश न्यूजचे पुणे रिपोर्टर सुनील शिरसाठ आणि गोवा रिपोर्टर विराज कामत यांनीही कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली.

Post a Comment
0 Comments