Type Here to Get Search Results !

महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्कार - शिक्षणप्रेमी शिक्षकांना मानाचा मुजरा!

* महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त कृती फाउंडेशन, कोल्हापूरचा उपक्रम

* 30 नोव्हेंबरला राजर्षी शाहू स्मारक भवनात पुरस्कार समारंभ

कोल्हापूर / प्रतिनिधी :- समाजसुधारक, शोषित-वंचितांना शिक्षणाचा प्रकाश देणारे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त कृती फाउंडेशन, कोल्हापूर यांच्यावतीने “महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्कार” हा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शिक्षणाच्या प्रसारासाठी आयुष्य वेचणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्याची ही एक प्रेरणादायी संकल्पना आहे.


अंध:कारमय समाजात ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करणारे महात्मा फुले यांनी जाती-पातीचा अंधश्रद्धा भेद मोडीत काढला, स्त्रीशिक्षणाचा मार्ग खुला केला, सर्वांसाठी शिक्षण हेच स्वातंत्र्याचे खरे साधन असल्याचा संदेश दिला. त्यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.


* महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्कार :- हा पुरस्कार केवळ एक ट्रॉफी किंवा प्रमाणपत्र नाही ; तर ज्ञानदीप पेटवत ठेवणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला मानाचे अभिवादन आहे. पुरस्कारासाठी  शिक्षक / शिक्षिका, प्राध्यापक, प्रोफेसर, अंगणवाडी सेविका, शिक्षणक्षेत्राशी कार्यरत सामाजिक कार्यकर्ते, फुले-दांपत्यांच्या शिक्षणविचारांना जपणारे व्यक्तिमत्व या क्षेत्रांतील व्यक्तींची नावे सुचवता येतील, तरी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


* सन्मानासाठी शिक्षकांची नावे सुचवा :- कृती फाउंडेशनने समाजातील सर्वांना आवाहन केले आहे की, आपल्या परिसरातील, विद्यालयातील प्रेरणादायी शिक्षकांची माहिती पाठवा. योग्य व्यक्तींच्या सन्मानामुळे समाजातील शिक्षणसेवेला नवचैतन्य मिळेल. नावे सुचवण्यासाठी 8263953044, 9765024443 (व्हॉट्सअ‍ॅप) संपर्क करा.


* पुरस्कार वितरण समारंभ :- सन्मानाचा भव्य सोहळा रविवार, 30 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे पार पडणार आहे.


* शिक्षक सन्मान - समाज परिवर्तनाचा पाया :- या उपक्रमाच्या माध्यमातून महात्मा फुले यांच्या शिक्षण परंपरेला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जात असून, ज्ञानाची ज्योत प्रत्येक घरात, प्रत्येक मनात पोहोचविण्याचे ध्येय या उपक्रमामागे आहे.


Post a Comment

0 Comments