Type Here to Get Search Results !

चौक ते कार्ला पायी दिंडी भक्तीमय उत्साहात

* एकवीरा देवी ग्रुप चौक परिसराची वर्षानुवर्षांची परंपरा कायम

* सामाजिक कार्यकर्ते नंदू हातमोडे यांच्या पुढाकाराने दिंडीचे आयोजन ; मार्गभर पूजा-अर्चा व भक्तांचे उत्स्फूर्त स्वागत

खालापूर / अर्जुन कदम :- चौक परिसरातील भक्तीपरंपरेला उजाळा देत एकवीरा देवी ग्रुप चौक परिसर यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही चौक ते कार्ला (आई एकवीरा देवी मंदिर, लोणावळा) अशी पायी दिंडी उत्साह आणि भक्तिभावात काढण्यात आली. चौक परिसरातील एकवीरा माता भक्तांनी या दिंडीला भरभरून प्रतिसाद देत मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवला.


* नंदू हातमोडे यांचा पुढाकार - भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग :- सामाजिक कार्यकर्ते तसेच एकवीरा देवी भक्त नंदू हातमोडे यांच्या पुढाकाराने ही दिंडी वर्षानुवर्षे काढली जाते. यंदाही त्यांनी चौक ते आई एकवीरा देवी कार्ला असा पूर्ण पायी प्रवास भक्तांसह मोठ्या श्रद्धेने पूर्ण केला. या प्रवासात अनेक भक्तांनी पायी चालत सहभाग घेतला.  माता एकवीरा देवीचा जयघोष, भक्तिभावाने प्रार्थना केल्याने वातावरण भक्तीमय झाले होते. जागोजागी स्वागत आणि पूजा अर्चा करण्यात आली. दिंडी मार्गावर विविध ठिकाणी भक्तांनी दिंडीचे स्वागत, आरती तसेच प्रसाद वितरण व माता एकवीरा देवीची पूजा करून पारंपरिक पद्धतीने सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. यामुळे संपूर्ण मार्गावर भक्तिभावाची लयलूट दिसून आली. स्थानिक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. दिंडीत चौक परिसरातील अनेक भक्त सहभागी झाले होते. त्यात विनोद भोईर, सागर ओसवाल, सुभाष पवार यांच्यासह अनेक भक्तांनी पायी चालत दिंडीत सहभाग घेतला. या सर्वांच्या उपस्थितीमुळे दिंडी अधिक भव्य आणि भक्तिमय झाली.


* दीर्घकाळ टिकलेली धार्मिक परंपरा :- चौक परिसराची ही दिंडी अनेक वर्षांची अविचल धार्मिक परंपरा असून श्रद्धा, एकोपा आणि भक्तिभाव यांचे प्रतीक आहे. यंदाची दिंडीही नेहमीप्रमाणे उत्साहात पार पडल्याने भक्तांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.

Post a Comment

0 Comments