Type Here to Get Search Results !

खोपोलीत मतदान जनजागृतीला वेग

* बॅनर आणि रांगोळ्यांच्या माध्यमातून लोकशाहीचा प्रभावी संदेश

* लक्ष्मीनगर, शास्त्रीनगरसह शहरभर आकर्षक बॅनर्स

* शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या रांगोळ्यांद्वारे “मतदान करा, लोकशाही मजबूत करा”चा संदेश

खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 जवळ येत असून शहरात मतदान जनजागृतीला उल्लेखनीय गती मिळत आहे. नगर परिषदेकडून विविध मार्गांवर आकर्षक बॅनर्स लावण्यात आले असून शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी रंगीत रांगोळ्यांद्वारे लोकशाही जनजागृतीचा प्रभावी संदेश साकारला आहे.


* बॅनर्सवर उठावदार संदेश - मतदानासाठी आवाहन :- लक्ष्मीनगर, शास्त्रीनगर, मुख्य चौक, बसस्थानक परिसर आदी ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनर्सवर नागरिकांचे लक्ष वेधणारी घोषवाक्ये झळकत आहेत. 

“उठा उठा, निवडणूक आली - मतदानाची वेळ आली”

“मतदान करा, लोकशाही मजबूत करा”

“मत द्या - विकासाचा भाग बना” ही घोषवाक्ये नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण करीत असून सर्वांनी मतदानात सहभागी व्हावे, असा संदेश देत आहेत.


* शाळांमधील रांगोळ्यांतून विद्यार्थ्यांची लोकशाहीप्रती जाणीव :- शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीवर आधारित आकर्षक व वैविध्यपूर्ण रांगोळ्या साकारल्या. या रांगोळ्यांवर

“तुमचे मत - तुमचा अधिकार”

“Vote for Better Tomorrow”

“Young Voters, Strong Democracy” असे प्रेरणादायी संदेश विद्यार्थ्यांनी रंगवले. यामुळे विद्यार्थ्यांमध्येही लोकशाही प्रक्रियेची सजगता वाढत असून मताधिकाराचे महत्व अधोरेखित होत आहे. शिक्षक व शाळा प्रशासनानेही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेबद्दल माहिती दिली.


* 2 डिसेंबरच्या मतदानासाठी नागरिकांना आवाहन :- खोपोली नगर परिषदेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, 2 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या मतदानात प्रत्येक मतदाराने आपला मौल्यवान मतदानाचा हक्क बजावून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा.


* नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद :- शहरातील जनजागृती उपक्रमांना नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून बॅनर्स व रांगोळ्यांचा संदेश जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहे. निवडणूक दिवस जवळ येत असताना जनजागृती अधिक व्यापक होत आहे.


Post a Comment

0 Comments