* सरदार एस. के. पवार विद्यालयातील नववीतील विद्यार्थ्यांचा उपक्रम ; शिक्षक व ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव
नगरदेवळा / प्रतिनिधी :- सरदार एस. के. पवार विद्यालय, नगरदेवळा येथील इयत्ता नववी ‘ड’ मधील विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला आहे. धीरज संतोष शेळके, किशोर अरुण पाटील आणि स्वराज गणेश रावळ या विद्यार्थ्यांनी सापडलेले पैसे प्रामाणिकपणे विद्यालय प्रशासनाकडे जमा करून समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले.
* पाण्याच्या टाकीजवळ सापडले पैसे :- दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास हे विद्यार्थी पाणी पिण्यासाठी टाकीजवळ गेले असता त्यांना दीडशे रुपये सापडले. परिसरात चौकशी करूनही संबंधित व्यक्ती सापडली नाही. त्यावेळी सर्व वर्ग सुरू असल्याने कोणाचा पैसा आहे हे ओळखता आले नाही. या परिस्थितीत त्यांनी कोणताही मोह न बाळगता प्रामाणिकपणे निर्णय घेत, हे पैसे विद्यालयाच्या पर्यवेक्षक दालनात जमा केले.
* उपमुख्याध्यापकांकडे पैसे सुपूर्द :- विद्यार्थ्यांनी उपमुख्याध्यापक व्ही. बी. गहरवाल सर तसेच वाय. डी. ठाकूर सर यांच्याकडे पैसे सुपूर्द केले. विद्यार्थ्यांच्या या प्रामाणिक वागणुकीमुळे शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या प्रामाणिकपणाचा सन्मान म्हणून विद्यालयाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन गौरविले. त्यांच्या या कृतीचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. ग्रामशिक्षण समितीचे व्हाईस चेअरमन सुभाष थेपडे, मानद चिटणीस शिवनारायण जाधव, किशोर पाटील, जगन्नाथ पाटील, वामन पाटील, गनी शेठ तसेच विद्यालयाचे प्राचार्य किरण काटकर यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.
या प्रसंगी व्ही. बी. गहरवाल सर, वाय. डी. ठाकूर सर, एस. पी. बावस्कर सर, व्ही. आर. जाधव मॅडम, सचिन देवरे सर, एम. आर. बाविस्कर सर, प्रवीण मोरे सर, वृषाल पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत त्यांच्या प्रामाणिकपणाचा सन्मान केला.

Post a Comment
0 Comments